Ad will apear here
Next
‘भाजप’ प्रदेश कार्यकारिणी बैठक २८ जानेवारीला
मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रदेश कार्यकारिणीची बैठक २८ जानेवारी २०१९ रोजी जालना येथे होणार आहे,’ अशी माहिती ‘भाजप’ प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी २२ जानेवारीला दिली.

ते म्हणाले, ‘प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘भाजप’ महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे, तसेच राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. राज्यातील भाजप मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष असे सुमारे एक हजार प्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहतील.’

‘प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या भाषणाने बैठकीचे उद्घाटन होईल. समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक असेल,’ असे त्यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZKOBW
Similar Posts
‘चंद्रकांत पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजप अधिक मजबूत बनेल’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, त्यांच्या संघटन कौशल्यामुळे सरकार व जनतेमधील संघटनेचा सेतू अधिक मजबूत बनेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
निवासी शाळा योजनेबद्दल ‘भाजप’ सरकारचे आभार मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांना साह्य करण्यासाठी राज्य शासनाने अलीकडेच शाहू-फुले- आंबेडकर अनुसूचित जाती-नवबौद्धांसाठी निवासी शाळा ही नवीन योजना लागू केली आहे. याबद्दल महाराष्ट्रातील शेकडो संस्थाचालकांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारचे आभार मानले आहेत
पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी माधव भांडारी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अधिक चांगल्या रितीने होण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समिती’ स्थापन केली आहे. प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची नियुक्ती केली असून, त्यांना कॅबिनेट मंत्री दर्जा देण्यात आला आहे
‘मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न’ मुंबई : ‘मराठा आरक्षणासाठी अतिशय प्रामाणिक व गंभीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत असून, हे आरक्षण देण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ जुलै रोजी केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language